जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता येऊन आठ महिने पूर्ण झालेले आहे. रस्त्यांच्या कामांचा अद्याप पत्ता नसताना दुसरीकडे या रस्त्यांच्या कामांवर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये आपापसात वाद सुरु झाले आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे सत्तेतील एका ज्येष्ठ नेत्यावर आरोप केले आहे.
पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी निधी दिला आहे. महापौर माजी महापौर व उपमहापौर यांच्या प्रभागातील कामांना प्राधान्य दिले जात आहे. आणि शहरातील इतर प्रभागातील कामांना प्राधान्य दिले जात नाही. त्या रस्त्याने वारी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शहरात येतात दुर्लक्ष का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेत सध्या बंडखोर व शिवसेनेतील मूळ 15 नगरसेवक असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यातही बंडखोर आणि पैकी दोन नगरसेवक देखील सेनेच्या नगरसेवकांनी सोबत असून जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या निधीतून कामे वाटप करताना ही इतर नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्याची माहिती बंडखोर नगरसेवकांनी दिली आहेत. तसेच याचे पडसाद येणाऱ्या महानगर महासभेत देखील दिसतील असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.