मुंबई राजमुद्रा दर्पण। राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचं निश्चित केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जाहीर केली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 251589 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती आयोगानं जाहीर केली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ज्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क जमा करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना पुन्हा एक संधी दिली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क जमा केल्यानंतर आयोगानं परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या जाहीर केली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल
उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.