वडूज राजमुद्रा दर्पण । जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार व अपक्ष उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी दहा मतांनी विजय मिळविला आहे. त्यांच्या या विजयानंतर घार्गे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे. तसेच सहकार पॅनेलचे उमेदवार नंदकुमार मोरे यांना 46 मते मिळवला आहे.
माजी आमदार घार्गे व जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार मोरे यांच्यातील उमेदवारी बाबत गेल्या काही दिवसांत चर्चा रंगली होती. घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे यांनीही सोसायटी मतदार संघ व महिला राखीवमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. घार्गे हे एका खटल्यात न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीतील एका गटाने मोरे यांचे समर्थन करीत घार्गे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केली होती. घार्गे यांच्या उमेदवारीबाबत पक्षातूनच शह- काटशहाचे राजकारण सुरू होते. त्यामुळे अखेरीस घार्गे यांनीच सोसायटी मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार घार्गे समर्थकांनी केला.