पाचोरा राजमुद्रा दर्पण । वंचित बहुजन आघाडीच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी विशाल बागुल यांची निवड करण्यात आलेली आहे. विशाल बागुल यांनी वंचित बहुजन आघाडीचे काम करत असताना पक्षाच्या आदेशानुसार पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यामुळे विशाल बागुल यांची निवड तालुकाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.
या पुढेही वरीष्ठांच्या आदेशाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करेन तसेच गावा गावात नव्याने वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या शाखा स्थापन करुन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन विशाल बागुल यांनी दिले.