जामनेर राजमुद्रा दर्पण । सोनाळा येथुन मोटार सायकलवर पहुरकडे जाताना कापुस व्यापाऱ्याला चार अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्या जवळचे ७ लाख रुपयांची रोकड रक्कम हिसकावून लुट करू पळून गेल्याची घटना दि. २४ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
जामनेर तालुक्यातील पहूर जवळ असलेले सोनाळा गाव येथील रहिवाशी कापुस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील आज सकाळी सोनाळाहून पहुरकडे मोटरसायकलने जात असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान जंगलातील तलावाजवळ अज्ञात चार चोरट्यांनी पाटील यांच्यावर बंदुक रोखुन धरत बंदुकीचा धाक दाखवून ७ लाख रुपयांची रक्कम हिसकावुन घेतली आणि तेथून पळ काढला.
या घटनेची पहूर पोलिस स्टेशनमध्ये संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन. उप विभागीय पोलीस अधीकारी भारत काकडे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.