जळगाव राजमुद्रा दर्पण | राष्ट्रवादीने पत्र काढून यांच्यावर यांच्यावर गंभीर टीका केल्यानंतर भाजपने देखील पत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे जळगाव शहरातील राष्ट्रवादी आणि भाजप मधील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीने काढलेल्या पत्रकामध्ये गिरीश महाजन यांच्यावर वर टीका- टिपणी केलेली असून महाजनांना टार्गेट करण्यात आले आहे. वरून राष्ट्रवादी महानगराध्यक्ष लाडवंजारी यांनी आमच्या नेत्यांबाबत केलेली भाषा महागात पडेल.. असा ईशारा दिला आहे. भाजपचे महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या समर्थनात पत्रक काढून राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष कट्टर खडसे समर्थक लाडवंजारी यांना प्रतिउत्तर दिले आहे.
जिल्हा बँकेत माघारीच्या वेळेत भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेतली व निवडणुकीवर बहिष्कार टाकला यामुळे उरली सुरली अब्रूही गेली असे वक्तव्य पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी आणि पराभव टाळता यावा म्हणून गिरीश महाजन नाथा भाऊंच्या मागे फिरत होते अशी खळबळजनक टीका राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी पत्रकाद्वारे केली थेट महाजनांवर टीका करण्यात आल्याने भाजपने देखील आक्रमकपणे पत्रक काढून जागा दाखवण्याची भाषा महागात पडेल असा ईशारा महानगराध्यक्ष लाडवंजारी ना दिला आहे.
काय आहे भाजपच्या पत्रकात ?
आमचे सहकारी पक्ष विचार तत्त्व मुल्यांची प्रतारणा करून केवळ राजकीय स्वार्थासाठी पक्षांतर करणारे अशोक लाडवंजारी यांचे बेकार नासमज वक्तव्य दैनिकातून प्रकाशित करण्यात आले या व्यक्त व याबाबतची भूमिका पुढील प्रमाणे आहे. भाजपमध्ये खंबीर नेतृत्व उरलेले नाही, माजी मंत्री खडसेंवर टीका करणाऱ्या आमदार गिरीष भाऊ महाजन यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे अशोक लाडवंजारी यांनी दिला आहे. लाडवंजारी यांना जे नाव मिळालेले आहे, ते भाजप व भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मेहनत आणि दिवंगत ज्येष्ठ नेते स्वर्गवासी. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावाचे फळ आहे. आमदार गिरीश महाजन यांचे सेवाकार्य कार्यकर्तृत्व प्रतिमा लोकप्रियता लाडवंजारी यांनी आज मानू नये हे म्हणजे हिमालया समोर टेकडी निवड वलग्ना करण्याचा हास्यास्पद प्रकार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार महाजन यांना त्यांची जागा दाखवून देईल ही त्यांची भाषा त्यांच्या अंगाशी येईल. हे लक्षात घ्यावे जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत लाचाराना हाताशी धरून बदमाशी करणे आणि तुल्यबळ उमेदवारांचे अर्ज बात करणे पक्षपात करणे मतदारांना घरोघरी पैसे पाठवत विकत घेण्याचा प्रयत्न करणे हे लपून राहिलेले नाही. रावेर मतदार संघात जाहीर माघारीच्या महागड्या जाहिराती प्रसिद्ध करून महाविकास आघाडी ने दिलेल्या उमेदवाराला पराभूत करणे पहिल्या तीन मध्ये बात करून घेणे यामागची कारणे शोधत आपल्या कथित नेत्यांना जाब विचारण्याची हिंमत लाडवंजारी व अन्य कुणी दाखवतील का ? असे ही तसे आमचे आव्हान आहे. गटबाजीने सध्याचे पद मिळवले लाडवंजारी यांनी अशी हिंमत दाखवावी असे आव्हान भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी लाडवंजारी यांना दिले आहे.