मुंबई राजमुद्रा दर्पण। नवाब मलिक यांचा एनसीबीचे संचालक समीर वानखेडे वर हल्लाबोल सात्यातने सुरु आहेत. नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडेंची आई जाहिदा यांचे मृत्यू प्रमाणपत्र सोशल मीडिया शेअर केले आहे. या प्रमाणपत्राद्वारे नवाब मलिक दावा करत आहे की, जाहिदा यांना ओशिवराच्या कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले होते. जाहिदा यांच्या मृत्यूनंतर वानखेडे कुटुंबीयांनी दोन मृत्यू प्रमाणपत्रे बनवले. या प्रमाणपत्रांद्वारे नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, जाहिदा यांच्या मृत्यूनंतर वानखेडे कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे तयार केले.
पहिल्या प्रमाणपत्रात जाहिदा यांचा धर्म हिंदू असे लिहिले आहे. दुसऱ्यामध्ये जाहिदाचा धर्म मुस्लिम असे लिहिले आहे. 16 एप्रिल 2015 रोजी जाहिदा यांचे निधन झाले. 16 एप्रिल 2015 रोजी पहिले प्रमाणपत्र तयार करण्यात आले ज्यामध्ये जाहिदाचा धर्म मुस्लिम असे लिहिले आहे. दुसरे प्रमाणपत्र 17 एप्रिल 2015 रोजी तयार करण्यात आले, ज्यामध्ये जाहिदाचा धर्म हिंदू असे लिहिले होते.