पुणे राजमुद्रा दर्पण । आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये IT ची कारवाई सुरु आहे. उद्योजक देवेंद्र शहा यांच्या उद्योग व्यवसायांसह घरावर IT ची छापेमारी सुरु आहे. पराग मिल्क उद्योग समुहावर IT ने छापेमारी केली आहे. चार टिम छापेमारीत सहभागी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समुहाचे दुध उत्पादनात जगभरात जाळं आहे. IT च्या छापेमारीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळुन आल्याने IT ची कारवाई सुरु केली. मंचर येथील पराग डेअरीमध्ये रात्री 2:15 वाजता IT ने छापा मारला तर अवसरी येथील पीर डेअरीमध्ये पहाटे 3:30 वाजता छापा मारला. देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी सकाळी 7:00 तर देवेंद्र यांचे मित्राच्या घरी सकाळी 9 :00 IT ने छापा मारला.
राज्यात ईडी, CBI, नंतर आता राज्यात इनकम टॅक्सने छापेमारी करायला सुरुवात केली आहे. अनेक बडे लोक, उद्योजक आयटीच्या रडारवर आहेत. मागच्या काही दिवसता आयटीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी केली होती. त्यानंतर केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका राज्य सरकारमधील नेत्यांनी केली होती. आता आयटीने थेट राज्याचे गृहमंत्री ज्या मतदार संघातून निवडून आले आहेत त्या आंबेगावमध्ये छापेमारी केली आहे.