मुंबई राजमुद्रा दर्पण । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संविधान तयार करण्यासाठी ज्या लोकांनी कठोर परिश्रम घेतले त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजच्या 26 नोव्हेंबर या दिवसाला एक वेगळं महत्व आहे. हा तोच दिवस आहे ज्या वेळी देश पारतंत्र्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतंत्र भारतानं संविधान स्वीकारलं. या दिवशी संविधान सभेनं संविधानाला मंजुरी दिली. देशात याच दिवसापासून संविधान लागू झाल्यानं आजचा दिवस संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला शुभेच्छा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाची एक प्रत पोस्ट केली आहे. 4 नोव्हेंबर 1948 च्या संविधान सभेतील भाषणातला हा मजकूर आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वीकारण्याचा प्रस्ताव संविधान समितीपुढे ठेवला होता. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की संविधान कितीही व्यवस्थित, सुंदर तयार केले असले तरी देशाचे खरे सेवक खंभीर, निस्वार्थी असल्याशिवाय संविधान काही करु शकत नाही म्हणत डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा देताना म्हटलं की, संविधान एकता आणि देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे. त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना नमन करत आदर व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांबरोबरच संरक्षणमंंत्री राजनाथ सिंह यांनीही संविधान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत देशभर संविधान गौरव अभियान चालवणार आहे. ज्यामध्ये यात्रा काढण्याबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.