मुंबई राजमुद्रा दर्पण। ‘सत्यमेव जयते 2’ भ्रष्टाचार आणि सत्तेच्या लालसेवर मात करण्याची ‘सत्यमेव जयते’ची स्टोरी लाईन फॉलो करतो. चित्रपट प्रेक्षकांना 80 च्या दशकाच्या वाईब्स देईल. भ्रष्टाचाराशिवाय शेतकरी आत्महत्या, महिलांवरील हिंसाचार, लोकपाल विधेयक यासारखे मुद्दे चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. यासोबतच आजच्या काळातील सोशल मीडिया आणि मीडियाबद्दलही चर्चा केली गेली आहे. सत्य आझाद एक प्रामाणिक गृहमंत्री यांना देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. मात्र यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तथापि, जेव्हा शहरात काही भीषण हत्या घडतात, तेव्हा एसीपी जय आझाद यांना मारेकऱ्याला पकडण्यासाठी पाचारण केले जाते.
आता यादरम्यान काय होते, हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना कळेल. जॉन अब्राहम त्याच्या पात्रांमध्ये खूपच मुरलेला दिसलाय. वडील आणि जुळ्या मुलांच्या भूमिकेत तो अद्गी चपखल बसला. त्याच्या पात्रात कुठेही गोंधळ दिसला नाही. दिव्या खोसला कुमारने तिची भूमिका उत्तम रित्या साकारली आहे. गौतमी कपूर, अनूप सोनी, झाकीर हुसेन या चित्रपटातील उर्वरित स्टारकास्ट यांनी आपली भूमिका चोख बजावली. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना ज्याप्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून चित्रपट पहिल्याच दिवशी 6-7 कोटींची कमाई करू शकतो,