जळगाव राजमुद्रा दर्पण । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षा सुनावण्यात आली होती. निवडणूक न लढविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती दाखल याचिका आता सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेवर यापूर्वी दोन वेळा सुनावणी झाली होती. सुनावणी लांबल्याने देवकर यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आणि ते विजयी देखील झाले. गुलाबराव देवकर यांच्याकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. दोघांनी सांगितले की, याचिकाकर्ता फक्त जळगावचा आहे म्हणून याचिका गृहीत धरता येणार नाही. प्रकरणाशी काहीही संबंध नाहीय. तसेच अशा याचिका गृहीत धरण्यात येऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे काही दाखले अॅड. रोहतगी आणि अॅड. निकम यांनी दिले. तसेच अशामुळे भविष्यात कुणीही उठसुठ याचिका दाखल करू शकतो, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे मोठ्या मताने विजयी झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना दिलासा मिळाला आहे.