मुंबई राजमुद्रा दर्पण। शेअरबाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 720 अंकांनी कोसळला . त्यानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरूच आहे, सध्या सेन्सेक्स 1420 अंकांनी कमी झाला असून 58 हजार अंकांपेक्षाही कमी पातळीवर व्यवहार सुरू आहेत. या आठवड्यात प्रत्येक दिवशी सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 58795 च्या पातळीवर पोहोचला होता.
मात्र आज पुन्हा एकदा सेन्सेक्स तब्बल 1420 अंकानी घसरला आहे. याचा मोठा फटका गुंतवणुकदारांना बसत आहे. दुसरीकडे निफ्टीत देखील मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार सुरू होताचा निफ्टी तब्बल 250 अंकांनी घसरली. सध्या निफ्टी 17338.5 अंकावर पोहोचली आहे. गुरुवारी सेन्सेक्स काही अंकांनी वाढल्यामुळे निफ्टीमध्ये देखील वाढ पहायला मिळाली होती. हा आठवडा शेअरबाजारासाठी फारसा सकारात्मक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. आज शेअरबाजार सुरू झाला तेव्हा बीएसई लिस्टेड 30 कंपन्याच्या यादीतील डॉक्टर रेड्डीज या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली, तर दुसरीकडे मारूती सुझुकी सारख्या कंपन्यांचे शेअर सध्या अडचणीत आहेत.