जळगाव राजमुद्रा दर्पण । भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अलीकडच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षात एकाकी आणि कमकुवत केले आहे. फडणवीस यांनी घाणेरडे राजकारण केले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. फडणवीसांनी आपले सर्व राजकीय प्रतिस्पर्धी संपवले. केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास त्यांना लाभल्यामुळे हे घडले असे खडसे म्हणाले.
भाजपानेच एकेकाळी त्यांना राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राचा नवा चेहरा, जाणकार, पुढच्या पिढीतील हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहिले होते. फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात माजी शिक्षणमंत्री तावडे यांना मंत्रिमंडळातून बाजूला सारले होते. अखेर २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी तावडे यांना तिकीट नाकारण्यात आले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या नागपुरातील माजी ऊर्जामंत्री आणि ओबीसी नेते बावनकुळे यांनाही तिकीट देण्यात आले नाही. यामुळे विदर्भात भाजपाला किमान सहा जागांचा फटका बसला. याबाबत राजकारणात संयमाची किंमत असते. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा एक मोठा संदेश आहे, असे विनोद तावडे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना म्हटले आहे. तर पक्षाने माझी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. आता त्यांनी मला परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. भूतकाळात जे घडले त्याबद्दल मी दुःखी का व्हावे?, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.