जळगाव राजमुद्रा दर्पण | माजी परिवहन व कृषिमंत्री राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना घरकुल प्रकरणातील झालेल्या शिक्षेमुळे निवडणूक लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती यावरून याचिकाकर्ते यांचा दावा सर्वाच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने मोठा दिलासा माजी मंत्री देवकरांना मिळाला आहे. जिल्हा बँकेतील संचालक पदाच्या निवडणुकी ला उमेदवारी करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. घरकुल प्रकरणात मी फक्त सयाजीराव असा दावा करणारे देवकर यांना न्यायालयाने घरकुल प्रकरणात शिक्षा ठोठावली होती. यामुळे त्यांना कारावास देखिल भोगावा लागला होता. या कार्यकाळात बराच वेळ राजकीय प्रवाहातून बाहेर राहिल्याने त्याचे विधानसभेतील विरोधक असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पारडे अधिक जड राहिले यामुळे दोन वेळा मंत्री पदे पाटील यांना मिळाली. देवकरांना मात्र उभा कायदेशीर व राजकीय संघर्ष करावा लागला.
तत्कालीन नगराध्यक्ष असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर घरकुल प्रकरणातील आरोपी असल्याने त्यांना शिक्षा लागली यामुळे त्यांची भारतीय कायदेशीर नियमानुसार त्यांची राजकीय महत्वकांक्षा भंगली होती. अशीच काही कारणामुळे देवकरांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवणे टाळले. मात्र पुढील निवडणूका लढण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झाला असून सर्वाच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्यांच्या राजकीय भवितव्याला नवी उभारी देणारा ठरला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घरकुल घोटाळ्यात शिक्षा लागली असली कारणाने त्यांच्या उमेदवारी वर घेण्यात आलेला आक्षेप घेण्यात आला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. जिल्ह्यातील राजकीय क्षितिजावर माजी मंत्री देवकरांना पुन्हा राजयोग अशी चर्चा न्यायालयाच्या निर्णयामुळे सुरू झाली आहे.
नुकत्याच झालेल्या सहकारातील जिल्हा बॅंकेची रणधुमाळीत महाविकास आघाडीला घवघवीत यश आल्याचे समोर आले यामध्ये राष्ट्रवादीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झाले देवकरांना मात्र अग्नी परीक्षा द्यावी लागली त्यात देखील ते यशस्वी झाले इतर संस्था मतदार संघाततुन मतदारांनी एकतर्फी निकाल देत देवकरांना विजयी केले आता जिल्ह्या बँकेतील चेरमन पदासाठी त्यांचेच नाव आघाडीवर असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांकडून समजते आहे. या वृत्ताला राष्ट्रवादीचे जिल्ह्या बँकेतील संचालक असलेल्या महत्वपूर्ण नेत्यांनी दुजोरा देखील दिला आहे. यामुळे देवकर हेच जिल्हा बँकेतील चेरमन होतील हे निश्चित मानले जात आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी देवकर यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याचे समजते आहे. जिल्ह्यातील एकमेव असलेल्या प्रमुख पदाकरिता संधी मिळत असल्याने यामुळे राजकारणाच्या प्रवाहात माजी मंत्री देवकारांची बाजू पुन्हा भक्कम होणार आहे.