धुळे राजमुद्रा दर्पण । भाजप आणि काँग्रेस मध्ये साटंलोटं झाल्याने धुळे व नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे ते सलग चौथ्यांदा विधान परिषदेत जाणार आहेत. कोल्हापुरमध्ये सतेज पाटील यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी भाजपच्या मुंबई व धुळ्यातील जागा बिनविरोध करण्यावर दोन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे अमरिश पटेल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
१९८५ मध्ये शिरपूर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणाला सुरवात केली. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी १२ वर्षे कार्य केले. १९९०, १९९५, १९९९ व २००४ अशा सलग चार निवडणुकीत ते काँग्रेसकडून शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. २००३-०४ मध्ये त्यांनी शालेय शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्रिपद भूषविले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
अमरिश पटेल यांनी २०१९ च्या विधा नसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला.पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात अमरिश पटेल यांनी उमेदवार अभिजित पाटील यांचा पराभव केला. आता सलग तिसऱ्यांदा ते उमेदवारी करीत आहेत.