बोदवड राजमुद्रा दर्पण । आगामी बोदवड नगरपंचायत निवडणूक संदर्भात भाजपा बोदवड पदाधिकारी यांची जेष्ठ कार्यकर्ते अनंत कुलकर्णी यांच्या निवासस्थानी खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत नगरपंचायत निवडणूक संदर्भात इच्छुक उमेदवार, तसेच निवडणूक भाजपा तर्फे करण्यात येणाऱ्या नियोजन बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, जेष्ठ कार्यकर्ते तथा मर्गदर्शक अनंत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, बोदवड शहराध्यक्ष नरेश अहुजा, तालुका सरचिटणीस राजेंद्र डापसे, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष रोहित अग्रवाल, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, भाजयुमो शहराध्यक्ष अभिशेख झाबक, भाजयुमो शहर उपाध्यक्ष राहुल माळी, भाजपा चित्रपट कामगार आघाडी जिल्हा सदस्य उमेश गुरव, शहर चिटणीस वैभव माटे, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अनिता अग्रवाल, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस शीतल देशमुख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वैशाली कुलकर्णी, मुक्तबाई पाटिल, बूथ प्रमुख संतोष चौधरी, विक्रम पाटिल, जिवन माळी, विशाल तायडे आदी उपस्थित होते.