जळगाव राजमुद्रा दर्पण | एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील एका तरुणावर पाळधी जलवळील साईबाबा मंदिरा जवळ काही जणांनी जीवघेणा हल्ला करीत खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कापूस व्यापारी असणाऱ्या या तरुणांकडे 15 लाखाची बॅग असल्याचे समोर आले आहे. मात्र त्याच्या सोबत असणाऱ्या मित्राला हल्ल्यात मारझोड करण्यात आली आहे. संबंधित मयत झालेला तरुण हा कापूस व्यापारी असल्याचे समोर आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, फरकांडे,ता. एरंडोल येथील कापूस व्यापारी असणारा स्वप्नील रत्नाकर शिंपी वय – 35 याच्यावर पैसे लुटण्याच्या हिशोबाने जीवघेणा हल्ला चढण्यात आल्याने रक्ताच्या थरोळ्यात पडत घटनास्थळी गतप्राण झाला आहे. चारचाकी अडवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या जवळ चार ते पाच अज्ञात इसम तोडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत दुचाकी वर आले होते चोरट्यांनी बंदूक व चौपर चा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करत असतांनाच एकाने कापूस विक्रेत्यांवर सपासप वार केला दरम्यान पैसे लुटण्याचा प्रयत्न संशयितांचा फसला आहे.
त्याच्या सोबत असणाऱ्या एका मित्राला देखील दुखापत झाल्याचे कळते आहे. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील कार्यवाही साठी मृतदेह पाचारण करण्यात आल्याचे कळते आहे.
पोलिसांनी तपासचक्रे फिरवण्यास सुरुवात केली असून नेमका कोणी खून केला ? याबाबत पोलीस तपास करीत आहे. लवकरच संशयिताला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.