जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव शहर सराफा बाजारात सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचा भाव १६८० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी ३५५० रुपयांनी स्वस्त झाली होती. तसेच सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे.लग्न सराई सुरु असल्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीचा चांगला काळ आहे. तरी सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे. २५ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१०० रुपये आहे. तर शुक्रवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये झालेला आहे.