दिल्ली राजमुद्रा दर्पण। जीएसटी वाढल्यास सोने चांदी आणखी महाग होईल. यासोबतच रेडीमेड कपडे, चप्पल यासह विविध वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्यामालावर जादा जीएसटी आकारण्याचा विचार सुरू आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केले. जीएसटी वाढवण्यात यावी की नाही यासाठी जीएसटी परिषदेकडून मंत्र्यांच्या एका समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे.
जीएसटी परिषदेकडून वस्तू आणि सेवाकर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार एखाद्या वस्तुंवर जर 5 टक्के कर असेल तर तो वाढवून 7 टक्के करण्यात येणार आहे. तसेच सध्या ज्या वस्तुंवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो तो वाढवून 20 टक्के करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. हा निर्णय मंजुरीसाठी जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत मांडण्यात येईल.