मुंबई राजमुद्रा दर्पण । सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला. पण भाजपचे दोन आमदार एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. काही आमदार एसटी डेपोत जाऊन कामगारांना भडकावत आहेत. भाजप संप भडकावण्याचा खेळ खेळत होती. आता कर्मचाऱ्यांना सर्व लक्षात येत आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर येत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
1999मध्ये राणेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. मुख्यमंत्रीपदासाठी ते काँग्रेसमध्ये आले. नंतर भाजपमध्ये गेले. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून ते सिंधुदुर्गात नवस मागत आहे. नवस पूर्ण झाला तर कोंबडं, बकरं वाहिल असं ते सांगत आहेत. त्यांच्या या नवसामुळे गेल्या 23 वर्षात बकरे आणि कोंबड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कमीत कमी या कोंबड्या-बकऱ्यांची लाज राखावी म्हणून सरकार पडणार असल्याच्या वल्गना राणे करत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे केंद्राच्या संसदीय समिती आणि संरक्षण समितीच्या बैठकीला गेले होते. पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही दिल्लीत होते. कालच राणेंनी मार्चमध्ये सरकार बनवणार असल्याचं सांगितलं. पवारांचा ज्या पद्धतीने फोटो व्हायरल केला तो पवारांना अपमानित करण्याचा प्रकार होता. तो मॉर्फ फोटो होता. भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा अधिक काळ चालणार नाही. आम्ही पवारांचा असली फोटोही व्हायरल केला. भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा उघड केला, असं सांगतानाच आमचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. त्यांनी खुशाल वारंवार भविष्यवाणी करावी. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सातत्याने स्वप्नं पाहावी. आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणारच, असंही त्यांनी सांगितलं.