दिल्ली राजमुद्रा दर्पण। ओमीक्रॉन (B.1.1.529 ) हा कोरोनाचाच नवा प्रकार आहे आणि तो डेल्टापेक्षा जास्त घातक आहे. विशेष म्हणजे तो सतत बदलत रहातो. चालू महिन्यात आफ्रिकेतल्या बोत्सवाना देशात तो पहिल्यांदा सापडला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, मोझंबिक, इस्टोनियासह सहा देशात त्याची लागण झालेले रुग्ण मिळाले.
नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही अडीच हजारापेक्षा जास्त झालीय. हा विषाणू वेगानं फैलावतो आणि त्याचा संसर्गही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं निदर्शनात आलंय. विशेष म्हणजे लस घेतलेली असेल तरीसुद्धा ओमीक्रॉनचा संसर्ग होत असल्याचं अभ्यासात स्पष्ट झालंय.
कोरोनाचा पराभव झाला असं वाटत असतानाच आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूनं धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय. त्याला गेल्या काही दिवसात न्यू नावानं ओळखलं गेलं. पण जागतिक आरोग्य संघटनेनं ओमीक्रॉन असं नाव दिलेलं आहे.
कोरोनाचा हा नवा अवतार दुसऱ्या लाटेतल्या डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचं जाणकारांचं म्हणनं आहे. अजून तरी आपल्याकडे ओमीक्रॉनची लागण झालेला एकही रुग्ण मिळालेला नाही. पण तो सापडणारच नाही असं सांगता येत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना अलर्ट रहायला सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर तर सतर्क रहाणं अत्यंत गरजेचं आहे.