पुणे राजमुद्रा दर्पण । एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता ही मागणी आली आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं सांगतानाच तुटेपर्यंत ताणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
परराज्यातून विमानाने येणाऱ्या प्रवाश्यांची यापुढे विमातळावर पुन्हा कोरोनाबाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार नाही. हवाई प्रवास करणारे सर्व प्रवासी हे प्रवास सुरु कारण्यापूर्वीच कोरोनाच्या सर्व तपासण्या तसेच लसीकरणाची माहिती देऊनच प्रवासाला सुरुवात करतात. त्यामुळं ते प्रवासी पुण्यात पोहचल्यानंतर त्याचा कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन- अडीच तास रांगेत थांबण्याची गरज नाही. त्यामुळे यापुढे बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या बाबतीत केंद्र सरकारने घालून दिलेलया नियमावलीचे पालन केले जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
विधान परिषदेच्या निवडणुकीवरून त्यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. मुंबईत दोनच उमेदवार निवडून येणार होते. मात्र तिसरा उमेदवार आला आणि नंतर त्याने माघार घेतली. कोल्हापुरात कितीही गप्पा मारल्या, कितीही आवाज काढले तरी सतेज पाटीलच निवडून येणार होते. राष्ट्रवादीचे सर्वाधिक मते होती. काँग्रेसची त्याखालोखाल मते होती. तर धुळे-नंदूरबारमध्ये अमरीश पटेल कुठेही गेले तरी ते विजयी होतात. ते भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडे संख्याबळ अधिक होते. त्यामुळे त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. अशा 6 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या. म्हणून एका ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसने माघार घेतली. आता भाजप, शिवसेना, काँग्रेसचा उमेदवार होता. त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने निवडणूक लागलेली दिसते, असं ते म्हणाले.