जळगाव राजमुद्रा दर्पण । आदिवासी वाल्मीक लव्य सेनेच्या अध्यक्षपदी विशाल सोनवणे आणि सहसचिव म्हणून निलेश सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली. दि. २७ रोजी “आदिवासी वाल्मीकलव्य सेना” या संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय जळगाव येथील गांधी मार्केट मजला क्रमांक एक येथे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांच्या हातून करण्यात आले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष शाना यांनी नवीन जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणी घोषित केली. त्यामध्ये जळगावचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून योगेश बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये वाल्मीक लव्य सेनाच्या तालुकाध्यक्षपदी विशाल तुकाराम सोनवणे विदगाव यांची व निलेश सुभाष सपकाळे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. त्याप्रसंगी नियुक्तीपत्र वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांनी दिले.