चाळीसगांव राजमुद्रा दर्पण । राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते नामदार प्रविण दरेकर यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दरेकर यांनी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
“ना खाऊंगा ना खाने दुंगा” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विचारणा जपत आपण आपले कार्य करत राहू असे आमदार चव्हाण म्हणाले. तर राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नसून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार हेक्टरी देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी चाळीसगांव तालुक्यातील नुकसान ग्रस्तांना 1 रुपया देखील दिला नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.
आझाद मैदानात सुरू असलेल्या १५ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला मा.दरेकर साहेब यांनी दररोज भेट दिली, कामगारांसोबत जेवणासह ऊन, वारा, पावसात कायम साथ दिली, दरेकर साहेबांनी दिलेल्या पाठबळामुळे हे आंदोलन पुढे नेता आले व पहिल्या टप्प्यात एक मोठी पगारवाढ सरकारला जाहीर करण्यास भाग पाडले. याबद्दल चाळीसगांव एसटी कामगारांनी दरेकर यांचे आभार मानले.