मुंबई राजमुद्रा दर्पण । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त पाच दिवसांचं करण्यात येणार आहे. शिवाय मार्चमध्ये नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे.
कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच दिवसांचं अधिवेशन घेण्यात येत असल्याबद्दल ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. चार-पाच दिवसच अधिवेशन घेण्याचं या सरकारचं घटत आहे. एकूण कामकाजाचे दिवस पाच आहेत. त्यातील पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो. म्हणजे चार दिवसाचं अधिवेशन होणार आहे, असं फडणवीस म्हणाले.
यंदा अधिवेशन नागपूरलाच झाली पाहिजे असं तिथल्या नागरिकांना वाटत आहे. आपली फसवणूक होत आहे असं जनतेला वाटतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात होते. त्यांना विमानाने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन मुंबईत घेण्यात येत असल्याचं आम्हाला सांगितलं गेलं. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. पण मार्चचं अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी केली. त्यावर बैठक करणार आहे. विशेष बाब म्हणून अधिवेशन घेण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.