मुंबई राजमुद्रा दर्पण। भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेन्ड मिताली पारुलकरसोबत साखरपुडा झाला आहे. हा साखरपुडा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. या साखरपुड्याच्या कार्यक्रमात परिवारातीलच लोक उपस्थित होते.
शार्दुल आणि मिताली बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी आपलं नातं अधिक घट्ट करण्याचा निर्णय घेत लग्न करण्याचा निश्चिय केला. त्यानुसार आज त्यांचा साखरपुडा दोन्ही परिवारातील सदस्य आणि मित्रांचा समावेश होता.