मुंबई राजमुद्रा दर्पण । यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात नाही तर मुंबईतच होईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशाची तारीख संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी जाहीर केली आहे. 24 डिसेंबरला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात येईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
22, 23, 24 असा कार्यक्रम नक्की झाला आहे, दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर असा कार्यक्रम ठरला आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिलीय. यंदाचं हिवाळी अधिवेशन किती दिवसांचं असेल हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. या अधिवेशनात 12 बिले, 11 विधेयके मांडली जातील.अधिवेशनात प्रश्नोत्तरे देखील घेतली जातील, अशी माहिती परबांनी दिलीय. अधिवेशन वाढवण्याचा निर्णय 24 डिसेंबरला होईल. एसटीच्या संपावर बोलताना अनिल परब म्हणाले, जो कुणी नेता एसटी सपाची जबाबदारी घेतो, त्याने कामगारांच्या नुकसानाची देखील जबाबदारी घ्यायला हवी. विलीनीकरनावर समिती व्यतिरिक्त कुणीही निर्णय घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.