नांदेड राजमुद्रा दर्पण । आपल्या मुलीच्या प्रियकराची तिच्या बापानेच खून केल्याची खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली. मुखेड तालु्क्यातील हसनाळ इथे महिनाभरानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आपल्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध आहे, हे कळाल्यानंतर तिच्या वडिलांनीच सुडातून तिच्या प्रयकराचा निर्घूण खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील २२ वर्षीय सुर्यंकांत जाधव याचे गावातीलच माधव थोटवे यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. थोटवेंना ही बाब कळल्यानंतर प्रियकर सुर्यंकांतने चार महिण्यापुर्वी गाव सोडले होते. परंतु सुर्यकांत गावाकडे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर थोटवे यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी एका नातेवाईकाला त्यांनी हाताशी धरले. सुर्यंकांतला एकट्याला रस्त्यात गाठून त्याचा खुन केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एका खड्ड्यात त्याचा मृतदेह पुरला. सुर्यकांत याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. परंतु महिना उलटलून गेला तरी त्याचा शोध लागत नव्हता. सुर्यंकांत अचानक गायब झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवंत संशयावरून त्याच्या प्रेयसीच्या वडिलांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून चौकशी करताच त्यांनी सुर्यकांतचा खून आपणच केल्याची कबुली दिली. तसेच सुर्यकांतचा मृतदेह पुरलेली जागाही पोलिसांना दाखवली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत या प्रकरणी थोटवे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकास अटक करून त्यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला.