जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार आज पासून कोरोना लसीकरणाच्या टार्गेट देण्यात आलेले आहे. तरी सदर दैनंदिन टार्गेट पूर्ण करण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी कमी काम असणाऱ्या संस्थेची, मुख्यधिकारी न.पा., गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक, यांची दैनंदिन आढावा बैठक घेणार आहेत.
प्रत्येक नगरपालिका/ग्रामपंचायत यांनी कोरोना लसीकरणाबाबत दवंडी/माईक द्वारे जनजागृती करून घरोघरी जाऊन आरोग्य टीम ला मदत करावी. ग्रामपंचायतिच्या संग्राम डेटा एन्ट्री ऑपरेटर व नगरपालिका कर्मचारी यांनी लसीकरण ऑनलाईन करण्यास मदत करावी. जि.प.शाळा मराठी/उर्दू व अंगणवाडी सेविका/मदतनीस यांनी दि.१५ डिसेंबरपर्यंत सक्रिय व प्रत्यक्ष सहभाग घ्यावा.
गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी एकत्रित कृती आराखडा तहसीलदार व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर करायचा आहे. ज्या ठिकाणी विरोध होत असेल त्या ठिकाणी गटविकास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक तहसीलदार यांनी समक्ष भेटी देऊन कामकाज पूर्ण करून घ्यावे. नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प.स.सदस्य, जि. प.सदस्य लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व सेवाभावी संस्था, विविध धर्माचे धर्मगुरू, मौलवी यांचा 100% कोरोना लसीकरणासाठी सहभाग घ्यावा.अश्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
1)बेटावद प्रा. आ.-
पहिला डोस :350
दुसरा डोस: 350
एकूण दैनंदिन टार्गेट:700
2)फत्तेपुर प्रा. आ.-
पहिला डोस:550
दुसरा डोस :550
एकूण दैनंदिन टार्गेट:1100
3)गारखेडा प्रा.आ.-
पहिला डोस:300
दुसरा डोस:300
एकूण दैनंदिन टार्गेट 600
4)नेरी प्रा.आ.
पहिला डोस:600
दुसरा डोस :600
एकूण दैनंदिन टार्गेट 1200
5)शेंदूर्णी प्रा. आ.
पहिला डोस :450
दुसरा डोस :450
एकूण दैनंदिन टार्गेट 900
6)वाकडी प्रा. आ.
पहिला डोस :600
दुसरा डोस :600
एकूण दैनंदिन टार्गेट 1200
7)वाकोद प्रा. आ.
पहिला डोस :600
दुसरा डोस :600
एकूण दैनंदिन टार्गेट 1200
8)पहुर ग्रा. रु.
पहिला डोस :300
दुसरा डोस :300
एकूण दैनंदिन टार्गेट 600
9)जामनेर उ.जि.रु.
पहिला डोस :600
दुसरा डोस :600
एकूण दैनंदिन टार्गेट 1200