(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
जळगाव शहरातील शिवाजी नगर उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन वर्षा पासुन अत्यंत कासव गतीने सुरू आहे. सदर काम पुर्ण करण्याची मुदत संपली असुन मक्तेदार आदित्य खटोड यांना भुसावळ रेल्वे DRM विवेक कुमार गुप्ता, Sr.DEN राजेश चिखले तसेच सार्वजनिक बांधकामं अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचा छुपा आशीर्वाद (पाठिंबा) असल्याचा आरोप सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.संजय मोरे यांनी केला आहे.
“दोन वर्ष पुर्ण होऊन देखील शिवाजी नगर उड्डाण पुलाचे बांधकाम अपूर्ण असून कासव गतीने सुरू आहे. दोन वर्षा पासुन नागरिकांची गैरसोय होत असल्याने नागरिकांना मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रास होत आहे. अगोदरच दोन वर्षा पासून संपुर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले असुन लोकांना रोजगार नाही. अशातच हा येण्याजाण्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. या परिसरातील नागरिकांना व दुचाकी वाहन धारकांना फिरून जावे लागत असून पैसा व वेळचा अपव्यय होत आहे. महत्वाचे काम वेळेत पुर्ण होत नाही.” असे संजय मोरे यांनी म्हटल आहे.
मुदतीत बाधकाम पुर्ण झाले नाही त्यास जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. सार्वजानिक बाधकाम, विभागाच्या कोणतेही अभियंताचे या कामावर लक्ष नाही. सा. बा. उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष राऊत यांची जबाबदारी असताना देखील ते वर्ष भरा पासुन या कामावर आलेले नाहीत. सुभाष राऊत यांच्याकडे, सा.बा.उपविभाग, भडगाव यांचाही तातपुरता चार्ज आहे. त्यामुळे त्यांचे या कामावर लक्ष नाही. जाणुन बुजुन भुसावळ रेल्वे DRM विवेक कुमार गुप्ता,Sr.DEN राजेश चिखले, प्रशांत सोनवणे, सा. बा. अधिक्षक अभियंता, गजेन्द्र सिंग राजपुत सा. बा. कार्यकारी अभियंता, यांचा छुपा पाठिंबा (आशीर्वाद) आहे. हे अधिकारी, जाणुन बुजुन मक्तेदार आदित्य खटोड यांना पाठीशी घालत असुन, सर्वांनी संगनमत करुन महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारची याची दिशाभुल करत आहेत. कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असून या कामामध्ये कारोडो रुपयाचा भ्रष्ट्राचार होण्याची शक्यता आहे. असा आरोप प्रा. मोरे यांनी केला आहे.
नागरिकांना व दुचाकी वाहन धारकांना तात्पुरता येणे जाण्याचा मार्ग निर्माण करावा. कामामध्ये, सुधारणा होऊन कामाची गती वाढवावी अश्या मागण्या करत कामाचा दर्जा न सुधारल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजानिक बाधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कडे तक्रार करण्यात येण्याचा इशारा प्रा. संजय मोरे येंनी दिला आहे.