जळगाव राजमुद्रा दर्पण । केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृतीम रीत्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशाने प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून या महागाईविरोधात भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांच्या नेतृत्वात जन जागरण अभियान राबविण्यात आले.
तालुक्यातील खेडोपाडी गावोगावी जाऊन मोदी सरकार विरुद्ध तीव्र घोषणाबाजी करून जन जागरण अभियान राबविण्यात येत आहे. पेट्रोल डिझेल चे भाव घरगुती गॅस चे भाव कमी व्हावे यासाठी पथनाट्य दिंडी काढून कार्यकर्त्यांच्या घरी मुक्कामी राहून जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे.