जळगाव राजमुद्रा दर्पण । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या शिफारशीनुसार जळगाव जिल्ह्याच्या तीन सरचिटणीस आणि तीन तालुकाध्यक्ष यांच्या निवडीस मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये जमील शेख शफी शेख यांची दुसऱ्यांदा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी सर्व कार्यकारणी बरखास्त केलेल्या होत्या. त्यानंतर नवीन कार्यकारिणी घोषित करण्यासाठी तीन सरचिटणीस आणि तीन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला होता. या प्रस्तावाला रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी मंजुरी मिळाली आहे.
त्यामध्ये जमील शेख शफी शेख यांची सरचिटणीस (प्रशासन) म्हणून दुसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे. तसेच मनोज मानसिंग सोनवणे, सरचिटणीस (संघटन), ज्ञानेश्वर शेनपडु कोळी, सरचिटणीस (जनसंपर्क) यांचीही नेमणूक झाली आहे. बोदवड, मुक्ताईनगर व चोपडा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी अनुक्रमे भरत त्र्यंबक पाटील, दिनेश सोपान पाटील आणि प्रदीप निंबा पाटील यांची देखील याच प्रस्तावाद्वारे निवड झाली आहे.