पुणे राजमुद्रा दर्पण । दक्षिण आफ्रिकेसह आसपासच्या ९ देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभुमीवर भारतातही सतर्कतेचा इशारा देण्यात आहे. त्यानुसार भारतात आणि महाराष्ट्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशभरातून कमी होत असताना आता दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरीयंटने पुन्हा खळबळ माजली आहे.
”दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या सात जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर सातपैकी सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे हे जाणून घेण्यासाठी या रुग्णाच्या तपासण्या केल्या जात असून जिनोम सिक्वेंसिंगसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याला ओमिक्रॉन नावाच्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे की नाही, समजू शकणार आहे. अशी माहिती संजीव वावरे यांनी दिली आहे.
याचशिवाय गेल्या काही दिवसांत आफ्रिकेसह आसपासच्या देशातून परतणाऱ्या आणखी नागरिकांचाही शोध घेतला जात आहे. महापालिकेनेही नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभुमीवर पुण्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबण्यास सुरुवात केली आहे. तसेच नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांना कोणत्या व्हेरीयंट संसर्ग झाला आहे हे तपासण्यासाठी त्या सर्वांची जिनोम सिक्वेन्सिंगची तपासणी करण्यात येणार असल्याचे संजीव वावरे यांनी सांगितले आहे.