मुंबई राजमुद्रा दर्पण । कोरोनाच्या नव्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र राजेश टोपे यांनी काल सांगितले होते की शाळा १ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. जगभरातील सर्वात जास्त प्रवासी ज्या मुंबईमध्ये येतात तिथल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने राखून ठेवले होता. त्यावर आता निर्णय झाला आहे. मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. १ ते ७ वी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबर नंतरच सुरु करण्याचा निर्णय घेणयात आला आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार जगभरात झपाट्याने पसरत असल्याने भारताची भुमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण महाराष्ट्र सरकारने विनंती केली आहे की ज्या १२ देशांमध्ये नव्या व्हेरियंटचा धोका आहे त्यामधून येणारी विमान वाहतूक बंद करण्यात यावी. शिक्षण विभागाकडून मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतरच मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.