जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगावचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ पुत्र विक्रम पाटील यांचा विवाह सोहळा २९ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. चोपडा तालुक्यातील शेतकरी सनपुले भगवान भिका पाटील यांची सुकन्या प्रेरणा हिच्यासोबत विक्रम पाटील यांचा विवाह झाला.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी सून म्हणून जाणारी ही कन्या अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातील आहे. प्रेरणा पाटील हिने बीएससी कंप्यूटरचे शिक्षण घेतले आहे. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव विक्रम हे बीई (मेकॅनिकल) आहेत. विक्रम हे व्यावसायिक आहेत. प्रेरणाचे वडील म्हणजेच गुलाबराव पाटील यांचे होणारे व्याही सनपुले भगवान भिका पाटील हे यात्रा केबल्स कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाला आहेत. घरची शेती सुद्धा ते सांभाळतात. मंत्र्यांचा मुलगा आणि शेतकरी कुटुंबातील लेक असा विवाह सोहळा २९ डिसेंबर रोजी पारधी येथे पार पडला. या सोहळ्यासाठी विविध मंत्री उपस्थिती होते.
गुलाबराव पाटील हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या मुलाचा विवाहदेखील त्यांनी साध्या पद्धतीने केला. पाळधी येथील साईबाबा मंदिरात हा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. लग्नसोहळा साधा असला तरीही या सोहळ्यात 14 मंत्री उपस्थित होते. या लग्नसमारंभात आ. छगज भुजबळ, जंयत पाटील,नवाब मलिक, अब्दुल सत्तार, उदय सावंत, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, आदिती तटकरे, संदिपान भुमरे, जितेंद्र आव्हाड, संजय बनसोडे आदी दिग्गज मंत्री आणि नेते उपस्थित होते.