मुंबई राजमुद्रा दर्पण। अनिल अंबानी यांच्या समूहातील या कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. रखडलेली देणी आणि कारभारातील गंभीर त्रुटी यामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय. यांची रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रिलायन्स कॅपिटलवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी आरबीआयकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात आरबीआयने म्हटले आहे की, रिलायन्स कॅपिटलकडे अनेक देणीदारांची देणी रखडलेली आहेत. तसेच कारभारामध्ये देखील अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय. हे रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक म्हणून काम पहातील.