धुळे राजमुद्रा दर्पण । कोरोनाचा नवीन व्हेरियण्ट ओमीक्रोन विदेशात पसरत आहे. या व्हेरियण्ट ओमीक्रोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे नागरिकांनी लसिकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातर्फे धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरियण्ट ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर ज्या नागरिकांचा अद्यापही लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही. अशा नागरिकांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.