पुणे राजमुद्रा दर्पण । पुणे येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली की नाही हे शोधण्यासाठी त्याची जिनोमिक स्किवेन्सिंग करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी सात दिवस लागणार आहे. तरी याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
25 नोव्हेंबरला केंद्र सरकारने नव्या विषाणूची दखल घेतली. आपण परदेशी प्रवाशांवर फोकस केला आहे. ज्या देशात ओमिक्रॉन आढळला आहे, त्या देशातून येणाऱ्या प्रत्येकाची आपण आरटीपीसीआर करत आहोत. त्याला लक्षणे असो किंवा नसो, त्याने लस घेतली असेल किंवा नसेल प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करत आहोत. पॉझिटिव्ह आली की आपण ती जेनेटिक्स सिक्वेन्सला पाठवत आहोत. निगेटिव्ह चाचणी आली तरी त्याला आपण सात दिवस क्वॉरंटाईन ठेवत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शिवाय त्यांना सात दिवस क्वॉरंटाईनही करण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे सौम्य असल्याचं दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरीया राज्यातील डॉक्टर सांगत आहेत. या आजाराची लागण झालेल्यांना प्रचंड थकवा येत असल्याचं कळतं. अभ्यासाअंती या आजाराची रचना समजेल. तसेच मध्यरात्रीपासून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.