मुंबई राजमुद्रा दर्पण । एसबीआयने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एक नवा नियम बनवला आहे. हा नियम कॅश ट्रांजेक्शनच्या संबंधित आहे. एसबीआयच्या नव्या नियमानुसार तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि जर एटीएममधून दहा हजारांपेक्षा अधिक कॅश काढायची असेल, तर तुम्हाला आता बँकेकडून एक ओटीपी पाठवण्यात येणार आहे. हा ओटीपी सबमिट केल्यानंतरच तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येतील.
ग्राहकांना ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेच्या वतीने हा नवा नियम बनवण्यात आला आहे. नव्या नियमामुळे ग्राहकांचा पैसा सुरक्षीत राहाण्यास मदत होणार आहे. तसेच दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असल्याने हा पैसा चुकीच्या हातात जाणार नाही.
एसबीआयच्या किंवा इतर कुठल्याही बँकेच्या एटीएममधून तुम्हाला रक्कम काढायची असल्यास आता तुम्हाला ओटीपी लागणार आहे. अर्थात ज्या ग्राहकांना दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची आहे, त्यांच्यासाठीच हा नियम असणार आहे. तुम्ही जेव्हा कॅश काढण्यासाठी एटीएममध्ये आपले कार्ड स्वॅप कराल व रक्कम टाकाल तेव्हा तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाकल्यानंतरच तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.