जळगाव राजमुद्रा दर्पण । नशिराबाद टोलनाक्याच्या बाजूला टेबल लावून फास्ट टॅगचे स्टिकर विक्री करण्यास मनाई करून टोल नाक्याच्या व्यवस्थापकसह तिघांनी उमरखान अन्वर खान राहणार भुसावल या तरुणाला मारहाण केली. ही घटना 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली. पेटीएम कंपनीत फास्ट टॅग विभागात कामाला असल्याने कंपनीमार्फत फास्ट टॅग स्टिकर विकण्याची परवानगी असल्याने त्याची विक्री करत होता. त्यास टोलनाक्यावरील लोकांनी विरोध करून मारहाण केल्याची तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मंगळवारी व्यवस्थापक मोहम्मद शेहवाल खान, शिवदत्त व दिग्विजय या तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.