जळगाव राजमुद्रा दर्पण। गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळामुळे अनेक मुलाच्या नोकऱ्या गेल्या सध्याच्या काळात शिक्षण घेऊनही नोकरी मिळणे आणि नोकरी नाही म्हणून लग्नासाठी मुलगी मिळणार की नाही या चिंतेत सापडला तरुण व्यसनाच्या आहारी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलगा शेतकरी असता तरी चालेल पण निर्व्यसनी असावा अशी मागणी वर पक्षाकडे मुलीचे पालक करताना दिसत आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेला नवरा मुलीला नको मुलगी शेतकरी मुलाला पसंती देत आहेत.
आज भारतात अनेक उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही . वाढत्या महागाईमुळे पुणे किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये कमी पगारात घर चालवणे शक्य नाही शेती व्यवसाय करण्यासाठी तेवढे पैसे नाहीत अशी बिकट परिस्थिती तरुणांची झालेली आहे त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य येऊन व्यसनाधिन होत आहेत त्यामुळे एक वेळा होणारा पती हा शेतकरी असला तरी चालेल पण व्यसनी नको अशी देखील मानसिकता मुली व पालकांची झालेली बघायला मिळत आहे.
काय आहेत मुलीच्या अपेक्षा ..
आजच्या काळात मुलीच्या उच्च शिक्षणामुळे वाढत्या अपेक्षांही जास्त प्रमाणात आहेत. मुलीचे पालक वर निवडताना बघतात मुलगा किती कमवतो त्याच घर,गाडी, स्थायी झालेला मुलगा बघतात. पण तोच मुलगा किती प्रमाणात व्यसनाधिन आहे. हे लग्ननंतर समोर आल्यावर मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागतो व तडजोड करावी लागते. नाही तर त्याचा परिणाम घटस्पोट होतो अश्या प्रतिकिया राजमुद्रा दर्पणशी बोलताना मुलींनी दिल्या आहेत.