मुंबई राजमुद्रा दर्पण। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची भेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीबाबत गुप्तता का पाळण्यात आली असा सवाल करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांचा नामोहरण करण्यासाठी गळे चिरणे याचे धडे गिरवले गेले आहेत का? याची माहिती महाराष्ट्राला पाहिजे.
कालपर्यंत भिवंडीमध्ये बांगलादेशी लोक पकडले जात होते. मग अशा पद्धतीने बांगलादेशींवरच्या कारवाया कुठे तरी थांबल्या पाहिजेत याची विनंती ममता बॅनर्जी यांनी युवा मंत्र्यांना केली नाही ना? उद्यापासून बांगलादेशींवरच्या कारवाया महाराष्ट्रात बंद, हे आश्वासन राजशिष्टाचार मंत्र्यांनी दिल्या नाहीत ना? असा सवाल शेलार यांनी केला आहे. नाते हे वरकरणी दाखवण्यासाठी आहे. कसले नाते? कोणाचे नाते? बांगलादेशी समर्थकांशी तुमचे नाते काय? बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्यांसोबत तुमचे नाते काय? या नात्याच्या गोष्टी महाराष्ट्राला मान्य नाहीत. रोजगार पळवण्यासाठी, महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्यासाठी आणि बरोबरीने बांगलादेशींवरच्या कारवाया थांबवण्यासाठी गुप्त बैठका चालू आहेत, असा आमचा आरोप आहे.