मुंबई राजमुद्रा दर्पण । मुंबईत देशाच्या राजकारणाला मोठे वळण देण्याची ताकद असलेली महत्त्वाची बैठक पार पडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ही बैठक झाली. शरद पवार म्हणाले की, ” सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे. मजबूत 2024 च्या निवडणुकीकरता सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभारण्याची गरज आहे. याच हेतूस्तव ममता बॅनर्जी यांनी हा दौरा केला. या बैठकीत त्यांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली.
ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या या बैठकीत 2024 मधील लोकसभा निवडणुकीची रणनिती आखली गेली. मात्र काँग्रेसचा यावर काय परिणाम होईल, तुमच्या अलायन्समध्ये काँग्रेसला वगळणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले, काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची बात आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.