धुळे राजमुद्रा दर्पण l धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच ब च्या पोटनिवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्विकृतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार काल पहिल्या दिवशी अशोक शंकर पाटील (अपक्ष) यांनी एक अर्ज तर आज दुसऱ्या दिवशी अनिता संजय देवरे (अपक्ष) यांनी एक अर्ज नेला. दरम्यान, आतापर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही.
नगरसेविका हेमाताई गोटे यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजप व महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारीची संधी मिळेल, याची उत्सुकता धुळेकरांना लागून आहे.