भडगाव राजमुद्रा दर्पण । नॅशनल अकॅडमी फॉर आर्ट एज्युकेशनचा इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स २०२१ या कला क्षेत्रातील अवार्डने नेहा मालपुरे यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना सुलेखन अर्थात सर्जनशील लिखाण या कला विभागात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, ऑनलाइन पद्धतीने तो वितरित करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व मेडल असे या अवार्डचे स्वरुप असून, नेहाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकाडमीचे चेअरमन डॉ दामोदर खडसे, आकाशवाणी कलाकार घनश्याम वासवानी, विको प्रयोगशाळा मुंबईचे संचालक संजीव पेंढारकर, थर्ड जनरेशन मोबाइल प्राइवेट लिमिटेडच्या जॉईंट मैनेजिंग डायरेक्टर सुजाता देव, भारत सरकार शिक्षण मंत्रालयच्या सहाय्यक संचालक अंजू सिंघ, सुरभी संस्थेच्या अश्विनी आमले, आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संपुर्ण भारतामधून विविध कला क्षेत्रातील १४ कलाकारांना हा अवार्ड देण्यात आला, त्यात नेहा मालपूरे यांनी यश मिळवत भडगावचे नाव रोशन केले आहे. ग्रामीण भागात राहुन छंदातुन साकारलेल्या कलेला व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून नेहा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत सहभागी होत असतात. यापूर्वी देखील नेहाच्या चित्राची व गणाक्षर या कलेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड सह विविध रेकॉर्डने घेतली आहे. भडगाव येथील समाजसेवक व मानवराज प्रतिष्ठानचे संस्थापक नीलेश मालपूरे व चित्रा मालपुरे यांची कन्या आहेत.