अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी मनुके खूप फायदेशीर आहेत. यासाठी एक मूठभर मनुके पाण्यात रात्री भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन करा. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते.
ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात ताक हे सात्विक अन्नाच्या श्रेणीत येते. ताकामध्ये लैक्टिक ऍसिड असते. जे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
काळी मिरी, लवंग, बडीशेप, हळद, तुळशीची पाने पाण्यात मिसळून मसालेदार पेय तयार करा. हे पेय दररोज सकाळी प्या.
आपल्या सर्वांना माहीती आहे की, गुलकंद खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.