जामनेर राजमुद्रा दर्पण । जामनेर येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक, मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक १ डिसेंबर रोजी शासन आदेशानुसार इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग सुरू करण्यात आले आहे. सर्व कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवून थर्मामीटरने तापमान तपासणी करून विद्यार्थ्यांना आत प्रवेश दिला जात होता. त्याच बरोबर विद्यार्थी पालकांचे हमीपत्र आणि संमतीपत्र जमा करून विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात गुलाब पुष्प देऊन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांचे हस्ते विद्यार्थ्यांचे करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य सोनवणे यांनी आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात सूचना दिल्या.