मुंबई राजमुद्रा दर्पण । आज मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. मरीन ड्राईव्ह परिसरात वाऱ्याचा वेग वाढला. काळे ढग दाटून आले. बुधवारी सांताक्रूझ येथे 28.6 मिमी, कुलाबा येथे 27.6 मिमी, पाऊस पडला. अरबी समुद्रामध्ये 30 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. 1 डिसेंबरला त्याची तीव्रता वाढल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर कमी होणार असला, तरी आणखी दोन दिवस मुंबई ठाण्यात पाऊस पडणार आहे. रायगड ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, पालघर, आदी जिल्ह्यांत पाऊस झाला असून आणखी २ ते ३ दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.