जळगाव राजमुद्रा दर्पण। ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण अतिशय वाढले आहे. शहरात बुधवारी सकाळ पासून पावसाचे वातावरण झाले होते. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. काही वेळ पावसाचा हलका शिडकाव झाला. वातावरण हे कश्मीर, मनाली सारखे झाले असून जळगाव शहरात तापमानाचा चढ उतार सुरूच आहे. थंडी ओसरत असल्याने वाटत असतानाच तापमानाचा पारा १० अंशावर स्थिरावला आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढला असून गार वाऱ्यामुळे जळगावकर गारठले आहेत. गेले दोन दिवसाच्याथंडी मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसासुद्धा लोकांच्या अंगावर उबदार कपडे दिसून येत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे अचानक होत असलेल्या ह्या बदलामुळे वायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हिवतापसारख्या आजारात वाढ झाली आहे आहे. जास्त प्रमाणात संधीवातचा आजार असलेल्या रुग्ण त्रास देखील वाढला आहे.
ऑक्टोबर महिन्यात सरासरी किमान तापमान १८ ते २० अंश इतके होती नोव्हेंबर महिन्यात किमान सरासरी तापमान १६ ते १८ अंशापर्यंत कायम आहे. थंडीच्या लाटेचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. शिवाय गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता आहे.