मुंबई राजमुद्रा दर्पण । सोमय्या यांनी आता थेट शिवसेनेचे महापालिकेती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाच घेरण्याचे संकेत दिले आहेत. यशवंत जाधव यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या मोठा बॉम्ब टाकण्याची चिन्हे दिसत आहेत. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली आहे. आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. यशवंत जाधव यांची अवस्था चोर मचाये शोर अशी झाली आहे. मात्र, काहीही असले तरी यशवंत जाधव यांच्या चौकशीला गती देण्यासाठी पाठपूरावा करणार आहे, असं सोमय्या म्हणाले.
मराठवाड्यातील चार नेत्यांनी 20 कोटी रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवले आहेत. ठाकरे सरकारच्या या नेत्यांचा घोटाळा उघड करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. बिटकॉईनच्या ट्रान्झॅक्शनची डिटेल माझ्याकडे आली आहे. मी सोमवारी ईडी कार्यालयात जाणार आहे. या घोटाळ्याची ईडी चेअरमन आणि केंद्रीय अर्थ खात्याला त्याची माहिती देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक करणारे हे तीन ते चार नेते आहेत. त्यांचे एजंट समोर आले आहेत. अशोक चव्हाणांचे जे मित्रं आहेत, त्यातून खूप काही बाहेर येणार आहे. पाहुयात काय होतंय ते, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील अनेक नेते आणि अधिकारी भ्रष्टाचारात आहेत. परमबीर सिंग यांना निलंबित केलं तसं या आरोप असलेल्या नेत्यांनाही निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली.